लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही
गोंदिया। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे,असे आवाहन वैष्णव शिंपी समाज गोंदिया चे प्रचारप्रमुख अतुल पेंढारकर यांनी केले आहे.
अतुल पेंढारकर म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर 60 दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या. त्यासाठी 28 एप्रिल नंतर cowin.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करा. कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रक्ताचा तुटवडा पाहून सामाजिक भान जपून रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन अतुल पेंढारकर यांनी केले आहे.
🩸🩸🩸 जाहीर सूचना 🩸🩸🩸
सर्व शिंपी समाज युवा बांधवांना व भांगिनींना कळविण्यात येत आहे की येत्या 1 मे 2021 पासून 18 ते 45 वयोगटातील युवकांना व भांगिनींना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नियोजना नुसार (COVID-19) लसीकरण घेता येणार आहे त्या पूर्वी सर्वांना एक आग्रही विनंती आहे की 🩸रक्त दान 🩸 करावे कारण लस घेतल्यावर 60 दिवस ( 2 महिने ) रक्तदान करता येणार नाही तर संपूर्ण गोंदिया व महाराष्ट्रात रक्तदानाचा तुटवडा होण्याची शक्यता आहे रक्ताची मागणी पाहता जास्तीत जास्त युवकांनी व भांगिनीं या सर्वांनी रक्तदान करावे ही विनंती……
वैष्णव शिंपी समाज गोंदिया च्या ज्या बंधू/ भांगिनींना रक्तदान करायचे आहे…. त्यांनी खालील दिलेल्या नंबर वर त्वरित संपर्क करावे ……
अतुल पेंढारकर- 9595857429 , 9595334697
दुर्गेश भिवगडे :- 9371994180
तुषार घडोले :- 9527454203, 8446761277
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
आजच आपल्या नावाची नोंदणी करावी….
🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
(टीप:-समाजातील गरजू लोकांना रक्ताची गरज भासल्यास वरील दिलेल्या नंबर वर संपर्क करावे)